Param Bir Singh फरार, आता मालमत्तांचा पंचनामा? ABP Majha
माजी गृहमंत्री आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त दोघेही फरार झाले... त्यातले माजी गृहमंत्री प्रकट झाले आणि त्यांना अटक झाली... पण मुंबईचे माजी पोलिस आयुक्त मात्र अजूनही बेपत्ता आहेत... मुंबईसह राज्यातल्या पाच ठिकाणी नोंद असलेल्या खंडणीप्रकरणी त्यांना फरार घोषित करण्यात आलंय... आणि 30 दिवसांच्या आत ते हजर झाले नाहीत... तर त्यांच्या संपत्तीवर टाच येणार आहे... आणि म्हणूनच परमबीर यांच्या नावावर असलेल्या पाच पॉपर्टीचा पंचनामा आम्ही केला... पंजाबपासून हरियाणापर्यंत आणि जुहू पासून नेरुळपर्यंतच्या या मालमत्तांचा शोध आम्ही घेतला... आणि त्यातून काय समोर आलं... बघुयात..