Parali Beed : कोरोनाच्या सावटात धनंजय मुंडेंकडून कार्यक्रमाचं आयोजन, सपना चौधरीचे परळीत ठुमके
महाविकास आघाडी सरकार मध्ये सामाजिक न्यायमंत्री असलेले धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेला कार्यक्रम कितपत योग्य आहे. असा प्रश्न उपस्थित होतोय. यापूर्वी 2018 मध्ये नाथ फेस्टिव्हल मध्ये सपना चौधरीच्या तेरी अखियो का ये काजल गाण्यानंतर धनंजय मुंडेंवर टीका झाली होती. सध्या कोरोनाचं सावट कायम असताना सर्वसामान्यांना सरकारकडून निर्बंध पाळण्याचे आवाहन केले जात असतानाच धनंजय मुंडेंच्या कार्यक्रमात मात्र थेट सपना चौधरी चा डान्स आयोजित केल्याने संताप व्यक्त केला जातोय.