Paper Leak Case : पेपरफुटीतील आरोपी Tukaram Supe कडून आणखी 10 लाख रोकड जप्त
TET Exam Scam Case : टीईटी पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे यांना अटक करण्यात आली आहे. संगमनेरमधल्या मूळ गावातून त्यांना अटक करण्यात आली. तर याच प्रकरणात बंगळुरूमधून जीए टेक्नॉलॉजीचे प्रमुख अश्विनकुमार यांनाही अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागानं ही कारवाई केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासात या प्रकरणाचे धागेदोरे कुणापर्यंत पोहचणार याबाबत उत्सुकता आहे.