Mahapalikech Mahasangram Panvel मध्ये प्रशासकीय राजवट, अधिकारी मनमानी करत असल्याचा नागरिकांचा आरोप

Continues below advertisement
पनवेल महानगरपालिकेत (Panvel Municipal Corporation) गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. निवडून आलेले प्रतिनिधी नसल्याने अधिकारी मनमानी कारभार करत असून पाणी, रस्ते, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधाही मिळत नसल्याचा आरोप पनवेलकरांनी केला आहे. वाढीव मालमत्ता कर, अनधिकृत फेरीवाले आणि कसाडी नदीतील प्रदूषणामुळे (Kasadi river pollution) वाढलेला आरोग्याचा धोका यांसारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. 'लोकांच्या समस्या ऐकणारा लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासकीय अधिकारी उत्तर देत नाहीत, त्यामुळे निवडणुका होणे गरजेचे आहे,' असे मत एका नागरिकाने व्यक्त केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola