Maharashtra Politics : साताऱ्यात महायुतीत फाटलं, कराडला भाजप, शिवसेना स्वतंत्र लढणार - अतुल भोसले
Continues below advertisement
कराड पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. 31 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे 104 जण इच्छुक असून, नगराध्यक्षपदासाठी 16 जणांची नावे चर्चेत आहेत. महायुतीमध्ये नगराध्यक्षपदावरून मतभेद निर्माण झाल्याने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष स्वतंत्र लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार अतुल भोसले यांनी सांगितले की, 'महायुती होण्यासाठी बैठका झाल्या असल्या तरी तोडगा काही निघत नसल्याचं जिल्हाध्यक्षांनी कबूल केलंय'. २०१६ साली भाजपचाच नगराध्यक्ष असल्याने, यंदाही हे पद पक्षाकडेच राहावे, अशी भाजपची मागणी आहे, ज्यामुळे जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement