Pankaja Munde setback | पंकजा मुंडेंना धक्का, राजाभाऊ-बाबरी मुंडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासोबत गेली पस्तीस वर्षांपासून असलेले राजाभाऊ मुंडे आणि त्यांचा मुलगा बाबरी मुंडे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये अजित पवारांची भेट घेऊन हा पक्षप्रवेश निश्चित करण्यात आला. माजलगाव, धारूर, तेलगाव आणि वडवणी या भागांमध्ये मुंडे कुटुंबाचे राजकीय वजन आहे. पक्षातून डावलले जात असल्याने मुंडेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पर्याय निवडला. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा पक्षप्रवेश होत असल्याने पंकजा मुंडे यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा बदल मानला जात आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.