Malegaon Blast Verdict | १७ वर्षांनंतर Malegaon स्फोट प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष मुक्त

मालेगाव स्फोट प्रकरणाचा एनआय विशेष कोर्टानं निकाल दिला. कोर्टानं सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सोडले. तपास यंत्रणांना स्फोटासाठी स्कूटर वापरल्याचं किंवा ती साध्वी प्रज्ञा सिंगच्या नावावर होती हे सिद्ध करता आले नाही. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांनी आरडीएस पुरवल्याचेही सिद्ध झाले नाही. "केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही, त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे." हे महत्त्वाचं निरीक्षण कोर्टानं नोंदवले. भिक्खू चौकात झालेल्या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचे प्राण गेले, शंभरहून अधिक जण जखमी झाले. तब्बल सतरा वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला. सरकारी पक्षाला बॉम्बस्फोट झाल्याचं सिद्ध करण्यात यश आलं, मात्र स्फोट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात ते अपयशी ठरले. तपासात अनेक त्रुटी राहिल्या, असंही कोर्टानं स्पष्ट केले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola