Pankaja Munde : महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे' घोषणांची गरज नाही : पंकजा मुंडे

Continues below advertisement

Pankaja Munde : महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे घोषणांची गरज नाही : पंकजा मुंडे 
बटेंगे तो कटेंगे.... महाराष्ट्रात प्रचारासाठी येणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची घोषणा.. मात्र या घोषणेवरून महाराष्ट्र भाजपातच बटवारा झालाय का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण पंकजा मुंडेंपाठोपाठ भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंनी देखील अशी घोषणा गरजेची नसल्याचं म्हटलंय. घोषणेपेक्षा महाराष्ट्रात विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे असं मत पंकजा मुंडेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मांडलं. यापूर्वी अजित पवारांनी योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे घोषणेवर आक्षेप नोंदवलाय. त्यामुळे ही घोषणा नेमकी महायुतीसाठी फायद्याची ठरणार की नुकसान पोहोचवणारी हे समजण्यासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram