Pankaja Munde Pune : भावासोबत प्रथमच मेळावा, पंकजा मुंडेंनी सांगितली दसरा मेळाव्याची जुनी आठवण

Continues below advertisement

Pankaja Munde Pune : भावासोबत प्रथमच मेळावा, पंकजा मुंडेंनी सांगितली दसऱ्या मेळाव्याची जुनी आठवण

 

मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) तब्बल 12 वर्षांनंतर आज भगवान गडावरील दसरा मेळाव्यात (Pankaja Munde Dasara Melava 2024) एकत्र आले आहेत. धनंजय मुंडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर मुंडे घराण्यात फुट पडली होती. त्यानंतर 2014 साली गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं. त्यानंतर आतापर्यंत पंकजा मुंडे यांच्या उपस्थित हा दसरा मेळवा पार पडत होता. 2023 मध्ये अजित पवार यांनी 2023 मध्ये महायुतीत येण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पुन्हा अनेकदा एकत्रित पाहायला मिळाले. मात्र आज धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच भगवान गडावरील दसरा मेळाव्याला उपस्थिती लावली आहे.  धनंजय मुंडेंनी घेतले नामदेव शास्त्री यांचे आशीर्वाद- धनंजय मुंडे (Dhananjay Munde) भगवान गडावर दाखल झाले आहेत. यावेळी धनंजय मुंडे यांनी भगवान गडावरील श्री संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या दर्शनानंतर धनंजय मुंडे यांनी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची देखील भेट घेतली. यावेळी नामदेव शास्त्री यांच्या पायावर डोकं ठेवत धनजंय मुंडे यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.   बॅनरवर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा फोटो नाही- भगवान गडावर आज माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत असून या दसरा मेळाव्यानिमित्त लावलेल्या बॅनरवर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा फोटो नसल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे. याबद्दल धनंजय मुंडे यांना विचारले असता माझ्यासारखा भगवान बाबांचा एक भक्त कुठला फोटो, कुठे असावा यासाठी नाही. तर बाबांची भक्ती आपण व्यक्त करावी, यासाठी इथे जात नाही. त्यामुळे फोटो असावेत नसावेत हे महत्त्वाचं नाही, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram