Devendra Fadnavis यांच्याकडून संयम ही शिकण्यासारखी गोष्ट : Pankaja Munde ABP Majha

Continues below advertisement

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या दोघांमधला सुप्त संघर्ष आणि शीतयुद्ध महाराष्ट्राला काही नवीन नाही. मात्र काल बीडच्या आष्टीमध्ये पार पडलेल्या प्रचार सभेत पंकजा मुंडेंनी देवेंद्र फडणवीसांच्या संयमाचं कौतुक केलं. ऐवढच नव्हे तर फडणवीसांकडून संयम शिकण्याचा सल्ला सभेत उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना दिला. पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातरी दरी हळुहळु कमी होत चाललीय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. दरम्यान मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं लोकार्पण सुरु असताना, या कार्यक्रमाचं मुंबईच प्रक्षेपण सुुरु होतं, यावेळी देखील दोन्ही नेते एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram