Pankaja Munde on MLC Election Result : पाच वर्षांनी विधानसभेत; पंकजाताईंची पिहिली प्रतिक्रिया
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPankaja Munde on MLC Election Result : पाच वर्षांनी विधानसभेत; पंकजाताईंची पिहिली प्रतिक्रिया
मुंबई : गेल्या 5 वर्षांपासून राजकीय अज्ञातवासात असलेल्या पंकजा मुंडेंचे अखेर राजकीय पुनर्वसन झालं आहे. तब्बल 10 वर्षांनी पंकजा मुंडेंसाठी (Pankaja munde) विजयाचा गुलाल उधळण्यात आला असून मुंडे कुटुंबीयांसाठी हा भावनिक क्षण आहे. त्यामुळेच, खासदारकीला पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर दु:खी झालेल्या प्रीतम मुंडेंच्या (Pritam munde) डोळ्यात आज आनंदाश्रू पाहायला मिळाले. विधानपरिषद निवडणुकीत 26 मतं घेऊन पंकजा मुंडे विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपने 5 उमेदवार उभे केले होते, भाजपच्या (BJP) पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे. मात्र, भाजपच्या पंकजा मुंडेंचा विजय झाल्यानंतर विधिमंडळ सभागृहात मुंडे समर्थकांनी जल्लोष केला. तर, मुंडे कुटुंबीय भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.