Pankaja Munde आणि Pritam Munde यांनी घेतली Nitin Gadkari यांची भेट
Continues below advertisement
भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी आज दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. मतदारसंघातील कामांच्या निमित्तानं भेटल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. मुंडे भगिनींसोबत आमदार नमिता मुंदडा यादेखिल उपस्थित होत्या. बैठकीत राजकीय चर्चा झाली नाही, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. अमित शाह यांना भेटलेल्या शिष्टमंडळात आपला समावेश नव्हता असं सांगत त्यांनी फडणवीस-शाह यांच्या भेटीवर बोलणं टाळलं.
Continues below advertisement