Pandharpur Wari Palkhi At wakhari : पालख्यांच्या स्वागतासाठी वाखरीचं पालखी तळ सज्ज, प्रशासनाची तयारी

Continues below advertisement

Pandharpur Wari Vitthal Mandir Tukaram Maharaj Palkhi Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 

पालख्यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज, वाखरीचं पालखी तळ पालख्यांसाठी सज्ज  

आळंदी आणि देहू येथून निघालेले संत ज्ञानेश्वर आणि देहू येथून निघालेले संत तुकाराम यांचे पालखी सोहळे आपल्या अंतिम मुक्कामासाठी ज्या ठिकाणी विसावतात तो वाखरीचा पालखी तळ आता सज्ज होऊ लागला असून येथे अंतिम कामे सुरु झाली आहेत . आज संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा धर्मापुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार असून उद्या संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा अकलूज येथे प्रवेश करणार आहे . त्या पार्श्वभूमीवर वाखरी येथील पालखी तळावर जोरदार तयारी सुरु झाली आहे .  गेल्या काही दिवसात पडलेल्या पावसामुळे येथे जमणाऱ्या लाखो भाविकांना अडचण येऊ नये म्हणून ठिकठिकाणी मुरूम टाकून जेसीबीने येथील जमीन मजबूत करण्यात येत आहे . ज्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने जनसागर थांबणार आहे त्याच्या सुरक्षेच्या दृष्ठीने पोलीस पाहणी सातत्याने केली जात असून ऐनवेळी कोणतीही अडचण भाविकांना येऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे .  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram