
Pandharpur : विठ्ठल मंदिराला 700 वर्षांपूर्वीचं मूळ रुप देण्यासंदर्भात आराखडा आज ठरणार
Continues below advertisement
पंढरपूर : विठुरायाच्या मंदिराला 700 वर्षापूर्वीचे मूळ रूप देण्याच्या आराखड्याबाबत आज अंतिम बैठक होणार असून यात या अंदाजे 40 ते 45 कोटींच्या आराखड्याला अंतिम मान्यता बैठकीत दिली जाईल. आज होणाऱ्या बैठकीस पुरातत्व विभाग, मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाचे आर्किटेक्चर प्रदीप देशपांडे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर अंतिम मंजूर केलेला हा आराखडा परवानगीसाठी विधी आणि न्याय विभागाला सादर केला जाणार आहे. शासनाच्या मंजुरीनंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल.
Continues below advertisement