Pandharpur Vitthal Temple Donation : विठ्ठला चरणी 8 कोटी 34 लाख रुपयांचं दान
Pandharpur Vitthal Temple Donation : विठ्ठला चरणी 8 कोटी 34 लाख रुपयांचं दान
त विठूरायाची तिजोरी भरली असून मंदिराच्या खजिन्यात तब्बल ८ कोटी ३४ लाख रुपये जमा झाले आहेत . गेल्या वर्षीच्या २ कोटी रुपये जास्त जमा झाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली . यावर्षी आषाढीला १८ ते २० लाख भाविक आल्याने पंढरपूर ओव्हरपॅक झाले होते . सर्वठिकाणी झालेला समाधानकारक पाऊस , ठिकठिकाणी उरकलेलं शेतीची कामे यामुळे यंदा खूप मोठ्या संख्येने भाविक आषाढीसाठी आले होते . याचाच परिणाम म्हणून देवाच्या तिजोरीत गेल्यावेळी पेक्षा २ कोटी रुपये जास्त जमा झाले आहेत . संपन्न झाली. या दिवशी मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. या यात्रेचा कालावधी दिनांक 6 ते 21 जुलै असा होता. या यात्रेमध्ये मंदिर समितीला 8 कोटी 34 लाखाचे उत्पन्न मिळाल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. यामध्ये श्रींच्या चरणाजवळ रू.७७ लाख ६हजार ६९४ /- , भक्तनिवास रू.५० लाख ६० हजार ४३७ , देणगी रू.३ कोटी ८२ लाख २६ हजार ८२८ , लाडूप्रसाद रू.९८ लाख ५३ हजार , पूजा रू.३ लाख ९९हजार २०९ , सोने भेट रू.१७ लाख ८८ हजार ३७३ , चांदी भेट रू.२ कोटी ३ लाख ६५ हजर २२८ व इतर रू.३ लाख ६४ हजर असे एकूण रू.८ कोटी ३४ लाख ८४ हजार १७४ असे उत्पन्न देवाच्या तिजोरीत जमा झाले आहे . आषाढी सोहळ्याच्या कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे पदस्पर्शदर्शन व मुखदर्शन अनुक्रमे सुमारे ४ लाख ८३ हजार ५२३ व ६लाख ५ हजार चार असे एकूण १० लाख ८८ हजार ५२७ इतक्या भाविकांनी घेतल्याचेही राजेंद्र शेळके यांनी सांगितले .