Balasaheb Thackeray diamond portrait:27 हजार हिऱ्यांनी सजवलेलं बाळासाहेबांचं पोर्ट्रेट,Making Video

Balasaheb Thackeray diamond portrait:27 हजार हिऱ्यांनी सजवलेलं बाळासाहेबांचं पोर्ट्रेट,Making Video

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं २७ हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरे यांना सुपूर्द   शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान यांची संकल्पना आणि ख्यातनाम आर्टीष्ट शैलेश आचरेकर यांची कलापूर्ती   उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी शिवसेनेच्या निष्ठावान परिवाराकडून अनोखी भेट    हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे २७ हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखे पोर्ट्रेट आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्रातील तमाम निष्ठावान शिवसैनिकांकडून सप्रेम भेट म्हणून देण्यात आले.  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि ख्यातनाम आर्टीष्ट शैलेश आचरेकर यांची कलापूर्तीने सजलेले हे हिऱ्यांनी नटलेले बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट अतिशय आकर्षक झाले आहे. शैलेश आचरेकर यांनी यापूर्वी आपल्या केलेमुळे अनेक पुरस्कार मिळवले आहेत.  ख्यातनाम कलावंत म्हणून ते सर्वश्रुत आहेत.  शैलेशने  हिऱ्यांनी साकारलेले बाळासाहेब खरोखर मनमोहक आहेत आणि बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात नक्कीच ते एक प्रमुख आकर्षण ठरेल अशी प्रतिक्रिया हे पोर्ट्रेट स्नेहपूर्वक स्वीकारताना  उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.    २७ हजार डायमंडनी साकारलेले हे पोर्ट्रेट बनवायला सहा महिन्यांचा कालावधी लागला.  शैलेश आचरेकर यांनी अतिशय बारकाईन यावर  काम केले आहे.  यापूर्वी त्यांनी असेच रतन टाटा यांचे पोर्ट्रेट तयार केले होते . उद्धवसाहेबाना पोर्ट्रेट देताना त्यांनी पाहता क्षणीच पहिली प्रतिक्रिया अरे वा सुंदर अशी प्रतिक्रिया दिली. याप्रसंगी शिवसेना नेते सर्वश्री संजय राऊत , विनायक राऊत,. शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर , हिंगोली - नांदेड संपर्काप्रमुख बबन थोरात बाळासाहेब आणि आता उद्धवसाहेबांचे स्वीय सहाय्यक रवी म्हात्रे,  आर्टिस्ट शैलेश आचरेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान आदी.  उपस्थित होते.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola