Pandharpur : विठुरायाची चंदन उटी पूजा; उन्हाचा त्रास नको म्हणून देवाला चंदनाटा लेप ABP Majha
राज्यात आणि देशात उष्म्याचा वणवा पसरत असताना याचा दाह देवाला जाणवू नये म्हणून परंपरे प्रमाणे विठुरायाच्या चंदन उटी पूजेस सुरुवात झालीय . वैशाख वणव्याची दाहकता चैत्रातच जाणवू लागली असताना विठुरायाला शीतल अश्या चंदनाचा लेप संपूर्ण अंगाला लावण्यात येत असतो . यासाठी खास म्हैसूर येथून उच्च दर्जाचे चंदन मागवण्यात आलेलं आहे. तिकडे तुळजापुरातही तुळजाभवानी मातेला पंख्यानं वारा घालण्यास सुरुवात झालेय. तुळजा भवानीचे सेवेदार अशलेल्या पलंगे घराण्याकडे या सेवेचा मान असतो... दुपारी १ ते ४ या वेळेत मखमली पंख्यानं हा वारा देवीला घातला जातो.