Pandharpur: पित्याकडून वडील-मुलगी नात्याला काळीमा फासणारी घटना : ABP Majha

एका बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केले आणि नंतर तिचे लग्न लावून देत हात पिवळे केल्याचा धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार पंढरपूर तालुक्यात समोर आला असून या नराधम वडिलांसह त्या अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या तिच्या पतीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत . दुर्दैवाने ती अल्पवयीन मुलीची प्रसूती झाली असून तिच्या पोटी कन्यारत्न जन्मले आहे . पोलिसांच्या माहितीनुसार दीड वर्षांपूर्वी पीडित मुलीचे मातृछत्र हरपल्याने मुलगी ही आपल्या वडीलासोबत रहात होती.  यातील धक्कादायक बाब म्हणजे आई मरण पावल्यानंतर वडीलांचे पिडीत मुलीशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले व मुलगी गरोदर राहिल्यानंतर नराधम वडीलाने  पिडीता हिचे लग्न समजातातीलच एका मुलाबरोबर लग्न लावुन दिले. त्यानंतर अल्पवयीन पिडीतेसोबत पतीने तीन ते चार वेळा शारीरीक संबंध ठेवला. यातील पिडीता हि आगोदरच गर्भवती असल्याचे समजल्या नंतर पतीने पीडित  मुलीला तिचे वडीलाकडे आणुन सोडले . यानंतर पीडित मुलीची सोलापूर येथील हॉस्पीटलमध्ये डिलीव्हरी झाली.  तिने एका बाळाला जन्म दिला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola