Pandharpur Lockdown : राज्यभर अनलॉक असताना पंढरपूरमध्ये संचारबंदी, व्यापाऱ्यांमध्ये संताप
सोलापुरातील पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा आणि सांगोला या पाच तालुक्यात संचारबंदी (Solapur Lockdown) लागू होत आहे. या संचारबंदीला व्यापाऱ्यांचा मात्र विरोध आहे. पंढरपूर व्यापारी महासंघाने संचारबंदीचे आदेश धुडकवात काळे झेंडे लावून दुकानं सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्यापारी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.