Pandharpur : पंढरपूरचं विठ्ठल मंदिर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लक्ष लक्ष दिव्यांनी उजळलं

Continues below advertisement

पंढरपूरचं विठ्ठल मंदिर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लक्ष लक्ष दिव्यांनी उजळलं. चातुर्मास संपल्यानंतर या दिवसाला पंढरपुरात विशेष महत्व आहे. काल रात्री विठ्ठल मंदिराला आधी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. तसंच मंदिर आणि परिसरात रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या. त्यानंतर मंदिरात आणि परिसरात लाखो पणत्या लावण्यात आल्या. या प्रकाशात मंदिर परिसर उजळून निघाला. आज चंद्रग्रहणालाही पंढरपूरचं विठ्ठल रखुमाई मंदिर भक्तांसाठी खुलं राहणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram