Pandharpur विठुरायाच्या चरणी अर्पण केलेले कोट्यवधींचे दागिने पोत्यात? विधी-न्याय विभाग गंभीर नाही?
Continues below advertisement
विठुरायाच्या खजिन्यात गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांकडून अर्पण केलेल्या कोट्यवधी रुपयाच्या सोने चांदीच्या लहान लहान वस्तू पोत्यात बांधण्याची वेळ आलीय. या दागिन्यांच्या एकत्रीकरण करण्याचा निर्णय होऊन दोन वर्षे झाली तरी अजूनही विधी व न्याय विभाग याबाबत गंभीर झालेला नाही. त्यामुळं 28 किलो सोनं आणि 996 किलो चांदीच्या हजारो वस्तू पोत्यात बांधून ठेवायची वेळ मंदिर समितीवर आलेली आहे.
दोन वर्षांपूर्वी याबाबत मंदिर समितीनं या लहान लहान अर्पण केलेल्या वस्तू वितळवून सोने आणि चांदीच्या विटा करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा विठुरायाच्या खजिन्यात या लहान वस्तूंमध्ये 3 किलो सोने आणि चांदी 166 किलो चांदीमध्ये वाढ झाली आहे. अजूनही याचा निर्णय झाला नाही, तर दुसरीकडे भाविकांकडून अर्पण होणाऱ्या वस्तूंमध्ये वाढ होत राहणार आहे.
Continues below advertisement