Pandharpur Corona : संचारबंदीतही कोरोना रुग्णवाढ सुरुच, पंढरपुरात काल दिवसभरात 167 नवे रुग्ण

Continues below advertisement

सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात कोरोना आटोक्यात येत नसल्याने प्रशासनाने 13 ऑगस्ट पासून या पाच तालुक्यात 10 दिवसांची संचारबंदी लावली होती. नागरिक आणि व्यापारी यांचा विरोध डावलून प्रशासनाने 10 दिवसाची संचारबंदी लागू करूनही कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कोणतीही ठोस आणि परिणामकारक उपाययोजना न वापरली गेल्याने रोज नवीन रुग्णांचे आकडे वाढतेच राहिले आहेत. मुख्यतः ज्या ग्रामदिन भाग कोरोनाचा स्फोट सुरु आहे त्या भागातील भाजीवाले, दूधवाले आणि ग्रामस्थ राजरोसपणे फिरत असल्याने कोरोना टोक्यात येण्याऐवजी वाढत चालला आहे. 

पंढरपूरमध्ये काल एका दिवसात 167 रुग्ण सापडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. गेल्या 12 ते 21 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर , माळशिरस , माढा , करमाळा आणि सांगोला या तालुक्यात तब्बल 4935 नवे रुग्ण सापडले असून 56 जणांचा मृत्यू या दहा दिवसात गेले आहेत. आता उद्या संचारबंदी शिथिल करणार की तशीच वाढवणार याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणताही आदेश निघाला नसला तरी ज्या गावात कोरोना आहे अशाच गावांना कडक निर्बंध लावून उपाययोजना केली तरच कोरोनाची संख्या आटोक्यात येणार आहे नाहीतर तिसरी लाट लांबच पहिल्यांदा सध्या सुरु असलेली दुसरी लाट तरी कधी संपणार असे म्हणायची वेळ नागरिकांवर येणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram