Pandharpur Corona | पंढरपूरचा उद्योजक संकटकाळात पुढे सरसावला, मल्टिप्लेक्समध्ये बनवले कोविड रुग्णालय
पंढरपूरची निवडणूक झाल्यानंतर पंढरपूरची अवस्था अतिशय वाईट झाली असून कोणत्याच हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसल्याने उपचाराविना मरणाऱ्यांची संख्या रोज वाढू लागली आहे . यातूनच आता पंढरपुरातील डीव्हिपी मल्टिप्लेक्स मधील दोन मजल्यावर कोविड हॉस्पिटलचे काम स्वखर्चाने एका उद्योजकाने सुरु केले आहे . अभिजित पाटील या उद्योजकाने आपल्या या मल्टिप्लेक्स मध्ये 50 बेडचे कोविद हॉस्पिटल उभे करताना यासाठी लागणारे सर्व वैद्यकीय उपकरणे औषधे आणि ऑक्सिजन याची तयारी करून ठेवली आहे . पहिल्या टप्प्यात ऑक्सिजनाचे 50 बेड यामध्ये तयार होणार असून येत्या दोन दिवसात हे हॉस्पिटल लोकांच्या सेवेत येणार आहे . सध्या हॉस्पिटल असले तरी यासाठी लागणारे तद्न्य डॉक्टर व नर्स मिळणे अवघड असल्याने पाटील यांनी हॉस्पिटल सुरु करण्यापूर्वी डॉक्टर आणि तद्न्य वैद्यकीय स्टाफ यांची नेमणूक केली आहे . आता मल्टिप्लेक्स च्या दुसऱ्या मजल्यावरही गरजेनुसार बेड वाढवण्याची तयारी पाटील यांनी केली असून पंढरपुरातील गोरगरीब नागरिकांना यामुळे कोरोनावर उपचार मिळणे शक्य होणार आहे .