Pandharpur : चंद्रभागा प्रदूषणाच्या विळख्यात, माझाच्या बातमीनंतर नगरपालिकेला जाग, सफाईला सुरुवात
Continues below advertisement
आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून संताच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाल्यात. पालख्यांसह हजारो, लाखो वारकरीही वारीत सहभागी झालेत..मात्र पंढरपूरची चंद्रभागा प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याने भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दरम्यान एबीपी माझाच्या बातमीनंतर पंढरपूर नगरपालिकेला जाग आली आणि चंद्रभागा नदी पात्राची सफाईला सुरुवात झाली.. एवढंच नाहीतर पहिल्यांदाच चंद्रभागा घाण करणाऱ्या ११ भाविकांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आलेय. प्रशासनाकडून वेळच्या वेळी चंद्रभागेची सफाई होत नसल्याने नदीला गटारगंगेच स्वरुप येत होते. मात्र वेळीत नगरपालिकेने पाऊले उचलून दंडात्मक कारवाईला सुरुवात केली..
Continues below advertisement