Pandharpur Wari : सरकारच्या नियमांचं पालन करणार; कोरोनाकाळात संत मुक्ताई पालखीची सामंजस्याची भूमिका

Continues below advertisement
दरवर्षी आषाढी पंचमी निमित्ताने संत मुक्ताई पालखीच आज पंढरपूरकडे प्रस्थान होत असते. यंदा मात्र कोरॉनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीला शासनाने परवानगी नाकारली असली, तरी बसने ही वारी पंढरपूर कडे नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. संत मुक्ताई पालखीची तीनशे बारा वर्षांची अखंड परंपरा कायम राहावी यासाठी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील संत मुक्ताई  संस्थानच्या वतीने कोथळी येथील संत मुक्ताबाई समाधी स्थळ म्हणजेच जुन्या मंदिर परिसरातून या पालखीची प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी ही मुक्ताईच्या नवीन मंदिरापर्यंत काढण्यात येत आहे. या ठिकाणी शासनाचे पुढील निर्देश आल्यानंतर ही वारी बसने पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पार्शवभूमीवर आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी मंदिर संस्थांचे अध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांच्या सोबत केलेली बातचीत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram