Palghar Rain : पालघर जिल्ह्यात अजूनही पावसाची संततधार कायम, नदी नाल्यांना पूर
Continues below advertisement
सलग दुसऱ्या दिवशीही पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे जिल्ह्यात 220 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत असून धरणक्षेत्रांत चांगला पाऊस झाल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या धरणांची पाणी क्षमता शंभर टक्के पूर्ण झाली असून या दोन्ही धरणा मिळून जवळपास 17 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सूर्या नदीत सुरू आहे त्याच्यामुळे सूर्या नदीच्या काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे,याच धामणी धरणातून जिल्ह्यातील औद्योगिक कार्यक्षेत्र त्याप्रमाणे प्रमुख शहर तसेच वसई विरार महानगरपालिका आणि शेती साठी पाणी पुरवठा केला जातो धरणफुल झाल्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचाही प्रश्न सुटला आहे याच परिस्थितीचा सूर्या नदीच्या काठावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी
Continues below advertisement