Palghar Drone Vaccination Supply : पालघरमध्ये लसीकरणाचा ड्रोन उडाला, लसपुरवठ्याचा जव्हारमध्ये प्रयोग
Continues below advertisement
संपूर्ण देशात सध्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका घोंघावतोय... त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यासाटी हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू केले आहेत. यात आता पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्यानं एक पाऊल पुढे टाकलंय. जव्हारच्या अतिदुर्गम भागात आता ड्रोनद्वारे लसपुरवठा करण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात येणार आहे. हा प्रयोग शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ब्लु इन्फिनीटी इनोवेशन लँब व आय आय एफ एल फाऊंडेशन च्या मदतीने राबविण्यात येत आहे. यामुळे दुर्गम भागात जलद गतीनं लस पोहोचवणं आणि प्रामुख्यानं त्या लशीची शीतसाखळी अबाधित ठेवणं शक्य होणार आहे. हा प्रयोग यशश्वी झाल्यास वैद्यकीय क्षेत्रातील अनेक गोष्टींसाठी याचा वापर महत्वपूर्ण ठरणार आहे.
Continues below advertisement