Palghar Dhamni Dam | पालघर जिल्ह्यात आठवडाभरापासून पाऊस! धामणी धरण 100 टक्के भरलं

Continues below advertisement

पालघर जिल्ह्यात आठवडाभरापासून चांगला पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील मोठी पाणी क्षमता असलेली धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण 75.56 टक्के भरले आहे. धरणाची पाणी पातळी 113.60 मीटर झाली असून धरणातील पाणीसाठा 208. 815 दशलक्ष घनमीटर झाला आहे. त्यामुळे आज दुपारी 12.30 वाजता या धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात येणार असून या धरणांमधून 3283 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदी द्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

       याच धरणामधून पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह वसई विरार महानगरपालिका आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो त्यामुळे या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
     तर आजही पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर असून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram