सरकार झोपेत असताना पडेल असं पाटील जागे असताना बोलले की झोपेत? अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील जागे असताना बोलले का झोपेत असताना बोलले हे समजत नाही. ज्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार आले आहे तेव्हापासून त्यांना असह्य झालं आहे. आपण सरकारमध्ये नाही याची त्यांना बोचणी लागली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुठं जाऊ नये म्हणून पुडी सोडण्याचे काम करीत आहे. जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र आहेत तोपर्यंत या सरकारला काही होणार नाही.