Pahalgam Attack | बदला यशस्वी! तीन दहशतवादी ठार, 'Operation Mahadev' ला यश

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यातील सुलेमान शहा आणि यासिर हे दोन दहशतवादी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होते. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून सुरक्षा दले या दहशतवाद्यांचा शोध घेत होती. 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत गेल्या पंधरा दिवसांपासून हा शोध सुरू होता. एप्रिल महिन्यापासून भारतीय सैन्य जम्मू काश्मीरमध्ये या दहशतवाद्यांचा शोध घेत होते. अखेर आज तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर एका दहशतवाद्याचा शोध अजूनही सुरू आहे. महादेव पीक आणि दाचीगाम नॅशनल फॉरेस्ट रिझर्व्हचा परिसर दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण बनला होता. भारतीय सैन्याने या परिसरात 'ऑपरेशन महादेव' राबवून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola