Congress Civil War: 'Operation Blue Star मोठी चूक होती', चिदंबरम यांच्या वक्तव्याने काँग्रेसमध्ये वादळ
Continues below advertisement
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही एक मोठी चूक होती आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपल्या जीवाची मोठी किंमत मोजावी लागली,' असे मत चिदंबरम यांनी व्यक्त केले आहे. हिमाचल प्रदेशातील कसौली येथे एका साहित्यिक महोत्सवात ते बोलत होते. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेस पक्षात तीव्र नाराजी पसरली आहे. खासदार संजय राऊत यांनी चिदंबरम यांची वक्तव्ये भाजपच्या भाषेसारखी असल्याची टीका केली आहे, तर काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनीही, चिदंबरम पक्षाला कमकुवत का करत आहेत, असा सवाल केला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, ज्यांना पक्षाने सर्वकाही दिले त्यांनी अशी वक्तव्ये टाळावीत, असे सुनावल्याची माहिती आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement