Thackeray Brother Meet : राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Continues below advertisement
राज्याचे भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य दिलजमाईवर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. 'उद्धवजी आणि राजासाहेब हे पारिवारिक भाऊ आहेत, दीपावलीच्या पर्वावर परिवार एकत्र आले पाहिजेत, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखे बघू नये,' असे स्पष्ट मत बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही काळापासून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विविध कौटुंबिक कार्यक्रमांनिमित्त दोन्ही नेते एकत्र दिसले होते. या पार्श्वभूमीवर, दिवाळीच्या मुहूर्तावर दोन्ही कुटुंब एकत्र यावीत, ही एक कौटुंबिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे आणि याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये, असे बावनकुळे म्हणाले. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola