Be Positive : गोकुळ दूध संघ उभारणार ऑक्सिजन प्लांट, सत्तेत येताच सतेज पाटलांचा पहिला निर्णय
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ लवकरच ऑक्सिजन प्लांट उभारणार असल्याची मोठी घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केली. गोकुळमध्ये सत्ता येताच अवघ्या दोन दिवसात पालकमंत्री पाटील यांनी हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केलाय. पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज नूतन संचालक मंडळाची बैठक घेतली. ज्यामध्ये या संदर्भातील सूचना देण्यात आल्यात. निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे दूध उत्पादकांना दोन रुपये दरवाढ देण्याचे आमचे प्रयत्न सुरू झाले असून दोन महिन्यात दरवाढ होईल अशी माहिती देखील यावेळी मंत्री पाटील यांनी दिली आहे.
Tags :
Corona News Covid 19 Corona Maharashtra Gokul Election 2021 Gokul Kolhapur Kolhapur News Maharashtra Corona Cases Lockdown News Gokul Election BE Positive Story BE Positive Gokul Election Results Gokul Election