Owaisi Kolhapur Protest | MIM कार्यालयाच्या उद्घाटनाला विरोध, Navratri उत्सवात तणाव

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या कोल्हापूर दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे. बागल चौकात एमआयएमच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ओवैसी येणार होते. मात्र, त्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे नवरात्र उत्सवात तेढ निर्माण होऊ नये, अशी भूमिका हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घेतली. यामुळे बागल चौक परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. हिंदुत्ववादी संघटनांनी स्पष्ट केले की, "कोल्हापूरमधली शांतता कुठेही आम्ही भंग करू देणार नाही." ओवैसींची पत्रकार परिषद आणि इचलकरंजी येथे जाहीर सभा नियोजित होती. परंतु, तीव्र विरोधामुळे ओवैसी बागल चौकातील कार्यालयाच्या उद्घाटनासाठी येणार नाहीत, अशी माहिती मिळत आहे. ते थेट पत्रकार परिषदेला संबोधित करतील असे अपेक्षित आहे. हा ओवैसींच्या कोल्हापूर दौऱ्यातील एक महत्त्वाचा बदल आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola