Maharashtra Floods | Dharashiv: धाराशिवच्या भोत्रा गावचा 5 दिवसांपासून संपर्क तुटलेला,सर्व रस्ते बंद

Continues below advertisement
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. धाराशिव जिल्ह्यात अनेक मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे अनेकांच्या शेतात आणि घरात पाणी शिरले आहे. धाराशिवमधील भोत्रा गाव गेल्या पाच दिवसांपासून पाण्याने वेढले असून, त्याचा संपर्क तुटलेला आहे. गावात ये-जा करणारे सर्व रस्ते बंद आहेत. अशा स्थितीत ABP Majha ची टीम स्थानिकांच्या मदतीने ट्रॅक्टरमधून भोत्रा गावात पोहोचली. गावातील शेतकरी त्यांचे दूध बाहेर आणू शकत नाहीत आणि कोणी आजारी पडल्यास त्याला उपचार मिळत नाहीत, अशी गंभीर परिस्थिती आहे. प्रशासनाची मदत पोहोचलेली नाही. गावाच्या चहूबाजूंनी पुराचा वेढा असल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संपर्क तुटल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola