Osmanabad : कोण घेत आहेत संपाचा गैरफायदा? आणखी किती दिवस सर्वसामान्यांना भुर्दंड बसणार?
पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची झळ सर्वसामान्य प्रवाशांना चांगलीच बसत आहे. शासनाने खाजगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची मुभा दिली आहे. तरी स्थानिक परिवहन विभागाकडून तिकीट दरावर नियंत्रण ठेवले जात नसल्याने प्रवाशांची जबरदस्त लूट सुरु आहे. शासकीय कार्यालये आणि बाजारपेठा या संपामुळे थंडावल्या आहेत.