Osmanabad | ज्या लोकांना विरोध करायचा आहे त्यांनी लोकशाही मार्गाने करावा : फादर फ्रान्सिस दिब्रेटो | ABP Majha
Continues below advertisement
पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिब्रिटो यांचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवलं होतं. त्यानंतर 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली होती. मात्र त्यांच्या निवडीला अनेकांनी विरोध केला होता. दिब्रिटो यांचं साहित्य ख्रिस्ती धर्मावर आधारित असल्यामुळे मराठी साहित्यामध्ये दिब्रिटो यांचे कामच नाही, असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे अध्यक्षपदी त्यांची निवड करू नये अशी मागणी अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. त्यामुळे संमेलनस्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Continues below advertisement