Sahitya Sammelan | ग्रंथ दिंडीने साहित्य संमेलनाचा शुभारंभ | ABP Majha
उस्मानाबाद इथं होणाऱ्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ ग्रंथ दिंडीने झाला आहे. मसापचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील ,मावळत्या अध्यक्षा अरुणा ढेरे आणि विक्रम काळे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन करण्यात आले आहे. ग्रंथ दिंडीला साहित्य प्रेमींसह लहान मुलं मुली आकर्षक वेशभूषा करून सहभागी झाले होते.