Pandharpur Vittha Mandir : पंढरपुरातील 7 मजली दर्शन मंडप पाडण्यास विरोध
भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी ३२ वर्षापूर्वी बांधलेला ७ मजली दर्शन मंडप आता जमीनदोस्त करण्याचा प्रस्ताव पंढरपूर विकास आराखड्यामध्ये आल्यानंतर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी विरोध दर्शविला आहे .भाविकांच्या पैशातून उभारलेल्या या इमारतीमध्ये सध्याच्या प्रकल्पानुसार बदल करून हीच इमारत वापरात आणावी अशी मागणी औसेकर यांनी केली आहे . याच इमारतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून जे बदल करायचे असतील ते करावेत मात्र हि इमारत जमीनदोस्त करू नये अशी भूमिका औसेकर यांनी मांडली आहे .
Tags :
Devotees Proposal Opposed Temple Committee Zamindost Sulabh Darshan 7 Storey Darshan Mandap Pandharpur Development Plan Co-Chairman Gahininath Maharaj Ausekar