NDA Vs INDIA : देशात INDIA विरुद्ध NDA, विरोधकांच्या आघाडीला इंडिया नाव
Continues below advertisement
NDA Vs INDIA : देशात INDIA विरुद्ध NDA, विरोधकांच्या आघाडीला नवं नाव
बंगळुरूमध्ये भाजपच्या विरोधकांची दुसरी बैठक पार पडली. या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, केजरीवाल, शरद पवार, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे उपस्थित होते. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीचं इंडिया असं नामकरण करण्यात आलंय. बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक नेत्यांनी भाजपवर घणाघात केलाय. त्याचप्रमाणे, आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार असून, ११ नेत्यांच्या समितीचे सदस्य आणि आघाडीचा नेता मुंबईतील बैठकीत ठरवण्यात येणारेय. तर दुसरीकडे दिल्लीत एनडीएची बैठक सुरु झालीय. या बैठकीला नरेंद्र मोदी, अमित शाहंसहएनडीएचे नेते उपस्थित आहेत. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीत उपस्थित आहेत.
Continues below advertisement