Operation Sindoor:भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास शत्रूचा सर्वनाश करणार, मोदींचा पाकिस्तानला इशारा
Operation Sindoor:भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास शत्रूचा सर्वनाश करणार, मोदींचा पाकिस्तानला इशारा
ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) हे काही सर्वसामान्य सैनिक ऑपरेशन नव्हतं, त्यामुळे भारताच्या लष्कराची ताकद जगाला समजली. भारतीय ड्रोन आणि मिसाईलच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराला झोपही लागणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारत हा गौतम बुद्धांचा देश आहे, तसेच गुरू गोविंद सिंहांचा देखील देश आहे. अधर्माचा संहार करण्यासाठी भारत हातात शस्त्र घेणार असं नरेंद्र मोदी म्हणाले. यापुढे जर भारताकडे वाकड्या नजरेने पाहाल तर सर्वनाश करू, त्यासाठी वेळ आणि पद्धत हे आम्ही ठरवू असा इशारा नरेंद्र मोदीं यांनी पाकिस्तानला दिला.
Narendra Modi Speech On Operation Sindoor : काय म्हणाले नरेंद्र मोदी?
भारत माता की जय हा आवाज देशातील त्या प्रत्येकाचा आहे जो देशासाठी काहीतरी करु इच्छितो. ज्यावेळी आमचे ड्रोन्स आणि मिसाईल शत्रूचा लक्ष्यभेद करतात, त्यावेळी शत्रूला फक्त भारत माता की जय ही घोषणा ऐकू येते. अंधारात ज्यावेळी स्फोट उडतात आणि शत्रूचा परिसर प्रकाशमय होतो त्यावेळी त्यांना भारत माता की जय हा आवाज ऐकू येतोय.
India-Pakistan Tension : अणवस्त्र हल्ल्याच्या धमकेची हवा काढून घेण्याची ताकद
जगाने भारतीय वायूदलाची ताकद पाहिली. आमच्या सैन्यात शत्रूच्या अणुबॉम्बची ताकद काढून घेण्याची धमक आहे. यापुढे ज्यावेळी भारतीय पराक्रमाची चर्चा होईल त्यावेळी लष्कराच्या कामगिरीची नोंद घेतली जाईल. भारतीय लष्कर हे देशातील युवकांसाठी प्रेरणा बनले आहे.
भारतीय लष्करामुळेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं. प्रत्येक भारतीय नागरिक आपल्या कार्याला सलाम करतोय. ऑपरेशन सिंदूर हे काही सामान्य सैन्य अभियान नव्हतं. ते भारताचे नीती, आणि निर्णायक क्षमतेची त्रिवेणी आहे.