Mumbai Covid patient beds shortage : मुंबईत केवळ 9% आयसीयू बेड आणि 8.3% व्हेंटिलेटर्स शिल्लक

मुंबई : राज्यात कोरोनाचं संक्रमण वेगाने होत आहे. काल दिवसभरात जवळपास 50 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे. त्यामुळे कोरोना संबधीचे नियम पाळणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग याचे पालण करणे गरजेचं आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसीकरण. राज्यात कोरोना वाढतोय तसा लसीकरणाचाही वेग वाढत आहे. काल दिवसभरात 4 लाख 62 हजार 735 जणांचं विक्रमी लसीकरण करण्यात आलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola