Onion Rate : कांद्याची आवक वाढणार पण, भावात घसरण होण्याची शक्यता
Continues below advertisement
आधीच अवकाळी व गारपिटीनं शेतकरी त्रस्त होता.. शेतकऱ्यांच्या कांद्याला अवघा कवडीमोल भाव मिळत असताना शेतकऱ्यांनी विविध आंदोलनं करत शासनाचं लक्ष वेधलं होतं.. याच पार्श्वभूमीवर शासनाने ३५० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करत दिलासा दिला आहे..१ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.. तसंच सानुग्रह अनुदानाची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे कांद्याची आवक वाढण्याची देखील शक्यता आहे.
Continues below advertisement