Onion Crisis: 'एकरी ७० हजार खर्च, पण कांदा परवडत नाही', Phaltan मधील शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया
Continues below advertisement
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचे दर कोसळल्याने मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. एकरी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च करूनही अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 'एकरी खर्च साठ ते सत्तर हजारांपर्यंत आहे, पण आता माल ठेवल्यानंतर त्याला घट तयार होती, कांदा नासतो, कारण कांद्याचे मार्केट आता फक्त बारा ते तेरा रुपये आहे,' अशी व्यथा पिंपरद येथील एका शेतकऱ्याने ABP माझाचे प्रतिनिधी जयदीप भगत यांच्यासमोर मांडली. शेतकऱ्यांनी चांगला दर मिळेल या आशेने कांद्याची साठवणूक केली होती, मात्र त्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. पंचवीस ते तीस रुपये दर अपेक्षित असताना केवळ १२ ते १४ रुपये मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यातच साठवलेला सुमारे ४० टक्के कांदा खराब झाल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement