Sanjay Raut : मतचोरी, घोटाळ्याच्या माध्यमातून महायुतीनं विजय मिळवला - संजय राऊत
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात महायुती (Mahayuti) आणि विरोधकांमध्ये 'नॅरेटिव्ह' सेट करण्यावरून जोरदार वाद पेटला आहे. या चर्चेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar), एकनाथ शिंदे (Eknath Shinde), राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला. 'फेक नॅरेटिव्ह राहुल गांधींविषयी, उद्धव ठाकरसाहेबांविषयी...हे भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलने काम केलेलं आहे, सुरू केलेलं आम्ही नाही,' असा थेट आरोप विरोधकांनी केला आहे. मतचोरी आणि पैशाच्या जोरावर महायुतीने विजय मिळवला असून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला आमचा 'नॅरेटिव्ह' सेट करावाच लागतो, असेही विरोधकांनी म्हटले. दुसरीकडे, पराभव समोर दिसत असल्यामुळेच विरोधक निवडणूक आयोग आणि मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून पराभवाची कारणे आधीच तयार करत आहेत, असा दावा सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement