Corona Vaccination: कोरोनाची लागण झालेल्यांना लसीचा एक डोस पुरेसा, अमेरिकेत संशोधन
Continues below advertisement
मुंबई : राज्यासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्यमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली असून उपचाराअभावी रुग्णांचे जीव जात आहेत. कोरोना साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र, लॉकडाऊन हा कायमस्वरुपी पर्याय नसून वेगाने लसीकरण होणं आवश्यक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. केंद्राने देशभरात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरणास खिळ बसली आहे. आता याच संदर्भात एक दिलासादायक बातमी आली आहे.
Continues below advertisement