#Lockdown सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा, बारामती शहरातही पूर्णपणे लॉकडाऊन
कोरोना संसर्गाचं चित्र अतिशय गंभीर वळणावर आलेलं असतानाच आता स्थानिक प्रशासन अधिकाधिक कठोर निर्णय घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियम लागू असतानाच आता सांगलीत हे निर्बंध आणखी कठोर केले जाणार आहे. खुद्द पालकमंत्री जयंत पाटील यांनीच जिल्ह्यात आठ दिवसांच्या सक्तीच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.