Omraje Nimbalkar : मल्हार पाटील यांच्या गौप्यस्फोटानंतर ओमराजे निंबाळकरांचा सवाल

Continues below advertisement

Omraje Nimbalkar : मल्हार पाटील यांच्या गौप्यस्फोटानंतर ओमराजे निंबाळकरांचा सवाल ठाकरे गटाचे उस्मानाबाद लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान दिले आहे. 2019 पासुनच राष्ट्रवादी फोडायचे षडयंत्र चालु होते का? असा सवाल ओमराजे निंबाळकर यांनी केला असून याबाबत स्पष्टीकरण अजित पवार यांनी स्वतः द्यावे असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हंटले आहे. 2019 ला अजित पवार यांच्या सहमतीनेच डॉ पाटील परिवाराने राष्ट्रवादी सोडत भाजप प्रवेश केला अजित पवार यांनी आम्हाला आधी पाठवले व नंतर ते स्वतः भाजप सोबत आले असा गौप्यस्फोट उस्मानाबाद लोकसभेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी केला होता. यावेळी आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप तर हातात धनुष्यबाण मल्हार पाटील यांनी म्हंटले होते. त्यानंतर ओमराजे निंबाळकरानी त्यांच्यावर हल्लाबोल करत अजित पवारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलेत त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली असून अजित पवार याला काय उत्तर देणार हे पाहावे लागेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram