Omicron Updates : कर्नाटकात ओमायक्रॉन, महाराष्ट्र सतर्क ABP Majha

ओमायक्रॉनच्या सावटात साहित्य संमेलन सुरु होत असतानाच काल ओमायक्रॉनचा भारतात शिरकाव झाल्याने साऱ्यांची चिंता वाढलीय. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन हा व्हेरियंट महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचलाय. कर्नाटत ओमायक्रॉन या व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळलेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिलीय... आफ्रिकेतून आलेले ६६ वर्षीय आणि ४६ वर्षीय रुग्ण ओमायक्रॉन व्हेरियंटनं संक्रमित आढळून आलेत. महाराष्ट्राच्या वेशीवर ओमायक्रॉनचे २ रुग्ण आढळल्यानं राज्यातही खबरदारी घेण्याची गरज निर्माण झालीय...दरम्यान कर्नाटकात ओमायक्रॉन व्हेरियंटनं बाधित झालेल्या प्रवाशाच्या संपर्ता एकूण २१८ जण आले होते...यातल्या ५ जणांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय..पण या ५ जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालीय की नाही याचा अहवाल मात्र प्रलिबंत आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola