Omicron Variant चा धोका वाढल्याने बायोएनटेक आणणार ओमिक्रॉनवरील प्रभावी लस
Continues below advertisement
Omicron Variant : जगभराची चिंता वाढवणाऱ्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटवर प्रभावी लस शोधण्याचं काम बायोएनटेक (BioNTech) कंपनीनं सुरु केलं आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढल्यास पुढील 100 दिवसांत लस बाजारात आणण्याची तयारी बायोएनटेकनं दर्शवली आहे. बायोएनटेक ही अमेरिकेत फायझर (Pfizer) सोबत मिळून कोविड (Covid-19) लस विकसित करणारी कंपनी आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग पसरत असल्याचं लक्षात येताच कंपनीनं त्यावर काम करणं सुरु केलं असल्याचं बायोएनटेककडून सांगण्यात येतंय.
Continues below advertisement